LPG Price Update : 1 ऑगस्टपासून काय बदलले? LPG गॅस ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, ‘या’ वस्तूंच्या किंमती वाढणार; जाणून घ्या
LPG Price Update : एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.

LPG Price Update : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाची झळ भारतासह इतर देशांना बसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम सातत्याने घेत असलेल्या मोठ्या निर्णयामुळे त्याचा फटका इतर देशांना बसत आहे. यातच आता १ अॅागस्टपासून ग्राहकउपयोगी वस्तूंसह इतर अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडर (कमर्शियल गॅस) १९२ रुपयांनी स्वस करण्यात आला आहे. आता त्याचा भाव २७३८ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (LPG Price Update)
मात्र, घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच असून त्यामध्ये कोणतीही दरवाढ लागू करण्यात आलेली नाही. मात्र, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या खिशाला झळ बसणार असून यामध्ये ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
४ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते (LPG Price Update)
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टपासून पॅकेज्ड चहा, हेअर ऑईल ( केसांसाठी वापरण्यात येणार तेल), रेफ्रिजरेटर, टीव्ही, रेडीमेड कपडे आणि प्रवासी वाहनांच्या किंमतींमध्ये ४ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
वाहनांच्या किंमतीत वाढ होणार (LPG Price Update)
चारचाकी वाहनांच्या किंमतीमध्ये देखील मोठी वाढ होऊ शकते. मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांची किंमती १५ ते ३० हजार रुपयांनी वाढू शकतात. तसेच इतर वाहन निर्मिती कंपन्या देखील किंमती वाढवण्याची तयारीत आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी यापूर्वीच या महिन्यात आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. या दरवाढीमुळे ग्राहकांना नवे वाहन खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.
दरवाढीचे कारण काय?
कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, पश्चिम आशियातील संघर्ष, वाढलेला मालवाहतूक खर्च, रुपयातील चढ-उतार, रुपयाच्या घसरणीमुळे आयातही महाग. या कारणांमुळे किंमती वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यंदाच्या वर्षात ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढवण्याची ही तिसरी वेळ असेल.





