Housefull 5 : काय सांगता…! पिक्चर एकच, क्लायमॅक्स दोन; ‘किल्लर कॅामेडी’चा नवा प्रयोग प्रेक्षकांच्या पचनी पडेल?

Housefull 5 has two climaxes: हाऊसफुल या फ्रेन्चाइचा हाऊसफुल ५ आज रिलीज होत असून, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल असे सांगितले जात आहे. चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही चांगली तिकिट विक्री केली आहे. मात्र, या चित्रपटात दोन क्लायमॅक्स असल्याने प्रेक्षकांना गोंधळात पाडले आहे. साजिद नाडियलवाला यांनी पहिल्यांदाच असा वेगळा प्रयोग आणला आहे, मात्र हा नवा प्रयोग प्रेक्षकांच्या पचनी पडणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तुम्हालाही हे वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल. पण ही गोष्ट खरी आहे.
एकाच चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स
हाऊसफुल फ्रेन्चाईच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. हाऊसफुल ५ मध्ये तब्बल १७ कलाकार किल्लर कॅामेडी करताना पाहायला मिळणार आहेत. यामध्ये रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, जॅानी लीव्हर, नाना पाटेकर यांच्यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. पण चित्रपटात असलेल्या दोन क्लायमॅक्समुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तिकिट बुकिंग करताना बुक माय शोवर हाऊसफुल ए आणि हाऊसफुल बी अशा दोन कॅटेगरी दाखविल्या जात आहेत. हा एकच चित्रपट आहे, फक्त क्लायमॅक्स वेगवेगळा असणार आहे.
…म्हणून किल्लर कॅामेडी टॅगलाईन
चित्रपटाची कथा सर्वसाधारणपणे शीपमध्ये एक व्यक्तीचा खून झालेला आहे. त्या व्यक्तीच्या खुनानंतर त्याच्या संपत्तीचा वारसदार म्हणून अनेकजण दावा करताना दिसतात. यामध्ये हास्य विनोद होताना दिसतात. मात्र, या व्यक्तीचा खूनी कोण आहे त्याने खून नेमका कशा कशासाठी केला आहे, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. म्हणून या चित्रपटाला किल्लर कॅामेडी अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
यामुळे आता चित्रपट एकच आणि दोन क्लायमॅक्स असा अनोखा प्रयत्न यशस्वी होणार का हे पाहणे लागणार आहे. अनेक प्रेक्षकांनी दोन क्लायमॅक्सवर नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेक जण या नव्या प्रयोगाचे स्वागत करत आहेत. शनिवारी बकरी ईदची सुट्टी असल्याने विकेंटला हाऊसफुल ५ चांगली कमाई करू शकतो, असं चित्रपट विश्लेषक सांगत आहेत.
हेही वाचा: हाऊसफुल 5 चं अॅडव्हान्स बुकिंग सुसाट! इतकी तिकिटे झाली सेल,आकडे समोर





