चीनचं करावं तरी काय ? गर्भनाळही सोडत नाहीत; सुकवून आईलाच खाण्यास देतात

नवी दिल्ली – चीनच्या लोकांच्या खाणण्यापिण्याच्या पद्धती जगभरात वादाचा विषय ठरल्या आहेत. वटवाघुळाचं सूप यावरून मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. यामुळेच जगभरात करोनाचा संसर्ग पसरल्याचा दावाही अनेक देशांनी केला होता. आता चीनमधून आणखी एक विचित्र बातमी आली आहे. यानुसार चीनमध्ये जन्माला आलेल्या बाळाची गर्भनाळही येथील लोक मोठ्या चवीन खात असल्याचं समोर आलं आहे.
चीनमध्ये याला प्लेसेंटोफॅगी असं म्हणतात. प्लेसेंटोफॅगीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात, असा येथील लोकांचा समज आहे. अगदी आई देखील बाळाच्या जन्मानंतर आपल्या बाळाची नाळ स्वत: खाते. ही नाळ एवढी महत्त्वपूर्ण असते की, अनेक वेळा रुग्णालयातून याची चोरी देखील होते.
महागड्या औषधांप्रमाणेच बाळाच्या नाळेची विक्री होते. नाळेला सूकवून त्याचा औषधाप्रमाणे वापर करण्यात येतो. अनेक लोक या नाळेचं सूप बनवून पितात.
चीनमधील लोकांच्या मते, गर्भनाळ खाल्ल्याने महिलेला बाळाच्या जन्मामुळे आलेला थकवा जाणवत नाही. पुरुषांच्या नपुंसकतेचासुद्धा हा उपचार आहे, असं सांगितलं जातं. मात्र या दाव्याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही.
याउलट डॉक्टरांनी याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असं म्हटलं आहे. तसेच प्लेसेंटा आईपासून मिळणारे पोषक घटक बाळापर्यंत फिल्टर करून पोहोचवतं. यात घातक बॅक्टेरिया आणि व्हायरस असू शकतात. यामुळे विविध आजारही उद्भवू शकतात, असंही डॉक्टरांनी नमूद केलं आहे.





