‘ती कोणती मोठी सेलिब्रिटी आहे, पोस्टरवर काळे फासा …’ तृप्ती डिमरीवर चाहते भडकले

‘ॲनिमल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात राजकुमार रावचीही भूमिका आहे. अशात या चित्रपटाचा जापूरमध्ये कार्यक्रम होता. मात्र
हे दोघेही जयपूरमधील कार्यक्रम गैरहजर राहिल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. तेथे उपस्थित एका संतप्त महिलेने तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. अभिनेत्रीच्या पोस्टरला काळे फासून तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकल्याचीही चर्चाही झाली अशी माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमासाठी तृप्तींनी मोठी रक्कमही घेतल्याचा दावा केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला खूप संतापलेली दिसत आहे. ती म्हणते, ‘तृप्तीचे चित्रपट कोणी पाहणार नाही. कमिटमेंट करून हे लोक येत नाहीत. वेळेचे व्यवस्थापन माहित असणे आवश्यक आहे. ही कोणी मोठी सेलिब्रिटी आहे का? तिचे नावही कुणाला माहीत नाही. कोण आहे ते बघायला आलो. तर हे सेलेब्स गैरहजर राहतात. ते सेलिब्रिटी म्हणवण्याच्या लायकीचा अजिबात नाही.’ असं म्हणत महिलेने संताप व्यक्त केला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाचे आयोजक तृप्तीच्या पोस्टरला काळे फासताना दिसत आहेत. अनेक महिलाही ‘तिच्या चेहरावर काळ फासले आहे’
दुसरी महिला म्हणाली, ‘जयपूरने तृप्ती डिमरीवर बहिष्कार टाकावा. तिच्यावर गुन्हा दाखल करू. मी अर्धे पैसे ट्रान्सफर केले होते आणि बाकीचे अर्धे ट्रान्सफर करणार होते पण मी थांबवले कारण ते मला 5 मिनिटे थांबायला सांगत होते. का माहीत नाही, पण मी त्यांना अर्धे पैसे दिले आणि त्यांच्याकडे अजून अर्धे पैसे आहेत. एकूण साडेपाच लाख रुपयांच डील झाल होत. जयपूरने तृप्तीच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा कारण आज आमचा अपमान झाला आहे.’
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तृप्तीचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. तिचा कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 3’ देखील आहे. आणि ती ‘धडक 2’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.
===============





