West Bengal Election Results 2021 : तृणमूलची ७५ तर भाजपाची ४३ जागांवर आघाडी
Updated On:

नवी दिल्ली – गेल्या महिन्याभरापासून आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या पाचही राज्यांचा निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. त्यामुळे आज कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यातच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने आतापर्यंत १२० जागांचे कल जाहीर केले आहेत. यामध्ये १२० पैकी तृणमूल काँग्रेस ७५ तर भाजपा ४३ जागांवर आघाडीवर आहे. महत्वाचे म्हणजे देशभरात जवळपास 822 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली आहे, यापैकी नंदीग्राम ही अशी एकच सीट आहे जी या साऱ्यांवर भारी पडली आहे. नंदीग्राम हाच मतदारसंघ बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे. नंदीग्राममधून आठ जण निवडणूक लढवत आहेत.






