BJP vs TMC : भाजपवाले बोलतात एक आणि करतात दुसरंच – ममता बॅनर्जी

शिलॉंग – भाजपचे लोक निवडणुकीच्या आधी एक बोलतात आणि प्रत्यक्ष निवडणुकीनंतर दुसरेच काही तरी करतात. हा पक्ष साफ दुटप्पी भूमिका घेणार पक्ष आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
मेघालयातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नॉर्थ गारो हिल्स जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना, बॅनर्जी यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या की, तृणमूल कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो ईशान्येकडील राज्यात चांगले प्रशासन देऊ शकतो, कारण तो लोकांची स्वप्ने पूर्ण करतो आणि त्यासाठीच काम करतो असे प्रतिपादनही त्यांनी केले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/delhi-aap-mla-mohinder-goyal-shows-bundle-of-notes-in-assembly-claims-bribe-offered-to-him/
केंद्रातील भाजप सरकारने सरळसरळ पक्षपाती स्वरूपाचा कारभार चालवला असून हे सरकार केवळ भाजपची सत्ता असलेल्या पक्षांनाच पैसे देते आणि विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांना त्यांचा न्याय्य वाटाही देत नाही असा आरोप त्यांनी केला. मेघालयात आम्ही खऱ्या अर्थान लोकांचे सरकार देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.





