Bhai Tera Star Hai : राघव जुयाल आणि निहारिका खरंच एकमेकांना डेट करत होते? अखेर सत्य आलं समोर
Bhai Tera Star Hai : पोस्टर समोर येताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याचे कौतुक केले. मात्र, सर्वाधिक चर्चा रंगली ती यूट्यूबर निहारिका एनएमच्या एका कमेंटची.

Bhai Tera Star Hai : अभिनेता राघव जुयाल लवकरच मोठ्या पडद्यावर मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच त्याने आपल्या आगामी ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. पोस्टर समोर येताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याचे कौतुक केले. मात्र, सर्वाधिक चर्चा रंगली ती यूट्यूबर निहारिका एनएमच्या एका कमेंटची.
निहारिकाच्या कमेंटने वेधले लक्ष
राघवच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना निहारिका एनएमने “My Boy” असे लिहित त्यासोबत मॅजिक इमोजीही पोस्ट केला. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या पोस्टरमध्ये निहारिकालाही टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे तीही या चित्रपटाचा भाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हेही वाचा : Life Tips: यशस्वी व्हायचंय? मग आजपासून अंगीकारा या 10 सवयी; यश तुमच्या पावलांशी येईल
डेटिंगच्या अफवांमागचे सत्य समोर?
गेल्या काही दिवसांपासून राघव जुयाल आणि निहारिका एनएम यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. दोघांनी शेअर केलेले रोमँटिक फोटो पाहून डेटिंगच्या अफवांना उधाण आले होते. मात्र, आता हे फोटो ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचे स्पष्ट होत असून, त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
View this post on Instagram
सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
राघवच्या नव्या चित्रपटाच्या पोस्टरवर कोरिओग्राफर रेमो डिसूझा, अभिनेता सिद्धार्थ जाधव, रजत बेदी यांच्यासह अनेक कलाकारांनी हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले. चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही राघवला त्याच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.
‘भाई तेरा स्टार है’ हा एक आगामी बॉलीवूड विनोदी चित्रपट आहे. अभिनेता राघव जुयाल आणि सोशल मीडिया स्टार निहारिका एनएम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक बी. अग्रवाल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राघव आणि निहारिका यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात संजय कपूर आणि निक्की वालिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.





