‘वॉर 2’मध्ये थिरकणार बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री?

War 2 Film Update | अभिनेता हृतिक रोशन ‘वॉर 2’ चित्रपटातून पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत ज्युनियर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपटात एक खास गाणे असणार आहे, ज्यामध्ये बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री असणार असल्याचा अंदाज काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त केला जात आहे.
‘वॉर 2’ मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर थिरकताना दिसणार आहे. सध्या तरी श्रद्धाशी याविषयी प्राथमिक बोलणी सुरु असून अजूनतरी यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
Instagram पर यह पोस्ट देखें
दरम्यान, ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येत असल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता खूप वाढली आहे. ‘वेक अप सिड’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘ब्रह्मास्त्र’ सारखे चित्रपट बनवणारा अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर आदित्य चोप्राच्या यशराज बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे.
‘वॉर’ 2019 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ एकमेकांना भिडताना दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर आता या चित्रपटाच्या पुढील भागासाठी देखील चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
हेही वाचा:
मणिपूरमध्ये उफाळला पुन्हा हिंसाचार ! NPP ने काढला सरकारचा पाठिंबा ; जाणून घ्या 10 मोठे अपडेट्स





