रेमडेसिवीर म्हणून भलतंच इंजेक्शन; नर्सचा प्रियकराच्या मदतीने ‘काळाबाजार’

पाटणा – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दररोज अडिच लाखाहून अधिक करोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. दुसऱ्या लाटेतील करोनाची लक्षणं पहिल्या पेक्षा अधिक तीव्र आहेत. त्यामुळे बाधितांना रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. त्यातच रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने इंजेक्शनच्या काळ्याबाजाराला उधाण आलं आहे. अशातच रेमडेसिवीर म्हणून रुग्णाला एक नर्स रुग्णालयात दाखल रुग्णांना नॉर्मल इंजेक्शन देऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करत होती आणि आपल्या प्रियकराला याचा पुरवठा करुन हे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकत असल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,’पाटणा येथील गिरधर कॉम्पलेक्स दानिशकुंज येथील रहिवासी असलेल्या झलकन सिंह याची प्रेयसी शालिनी जे के रुग्णालयात नर्सिंह स्टाफ आहे. ( नर्स )प्रेयसी रुग्णांना रेमडेसिवीरच्या जागी दुसरं नॉर्मल इंजेक्शन देत होती. रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याजवळच ठेवत होती. हे इंजेक्शन तो 20 ते 30 हजारात विकत होता. जेव्हा पुलिसांनी रेमडेसिवीरच्या काळाबाजाराबाबत चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघडीस आला.
दरम्यान, देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार सुरु असून प्रत्येक दिवसाला अशा घटना उघडीस येत आहे. काही दिवसनापूर्वी कर्नाटकातील म्हैसूरमधील जेएसएस रुग्णालयातील स्टाफ नर्स गिरीश हा 2020 पासून करोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर म्हणून खाऱ्या पाण्यात अॅंटिबायोटिक्स मिसळून इंजेक्शन देत असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी गिरीशला अटक करण्यात आली होती.





