Harshvardhan Sapkal : ‘शाब्बास…तुम्ही परंपरा जपली!’; सावरकर आणि मोदींचा AI फोटो शेअर करत हर्षवर्धन सपकाळांची टीका
Harshvardhan Sapkal : अमेरिकेने भारताला रशिया कडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सूट दिली आहे

Harshvardhan Sapkal : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली Strait of Hormuz सामुद्रधुनी काही काळासाठी बंद केली. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक होते.
या संकटाच्या काळात अमेरिकेने भारतासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारताला रशिया कडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सूट दिली आहे. “भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी भारताला रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची परवानगी देण्यात आली आहे.” या निर्णयामुळे सध्या समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकरमधून भारताला तेल खरेदी करता येणार आहे.
यासंदर्भातील अमेरिकेचे परिपत्रक जारी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भारताला आता प्रत्येक गोष्ट करण्यासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागणार का? दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष भारताला कोणाकडून तेल विकत घ्यायचे, हे कसे काय सांगू शकतो? असा सवाल आता केला जात आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा एक काल्पनिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदीच्या पाठीवर ‘तडजोड करणारा’ अशी पाटी लावली आहे.
तर त्यांच्या हातात अमेरिकेच्या परवानगीचा कागद दिसत आहे.तर ‘शाब्बास…तुम्ही परंपरा जपली!’, असे सावरकर मोदींना म्हणताना या छायाचित्रात दिसत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Harshvardhan Sapkal
यापूर्वी टिपू सुलतान वादावेळी हर्षवर्धन सपकाळ चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. Harshvardhan Sapkal
हेही वाचा :





