Pune District : हवेलीकरांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Updated On:
Photo 1

वाघोली  : शिरूर- हवेली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक व भाजप पदाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून शिरूर- हवेलीत मोठ्या उत्साहात स्वागत केले.

शिरूर तालुक्यातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी भाजप अधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांची सदिच्छा भेट घेतली. शिरूर- हवेली विधानसभेचे भाजपचे नेते प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव व इतर पदाधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचा शिरूर- हवेलीमधील नागरिकांच्या वतीने सत्कार केला.

यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. शिरूर- हवेलीमध्ये जास्तीत जास्त निधी देऊन विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात अखेरपर्यंत भाजप यशस्वी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट ही कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा स्त्रोत असल्याचे भाजपचे नेते प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.

 

आणखी संबंधित बातम्या

Pune shivajinagar court : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्बची दहशत.! बॉम्बच्या चर्चेने संपूर्ण परिसर केला रिकामा

Pune shivajinagar court : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्बची दहशत.! बॉम्बच्या चर्चेने संपूर्ण परिसर केला रिकामा

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील जलसंकटावर 'वृक्षाधारित शेती'चा उपाय; 'जलयुक्त शिवार 3.0' मध्ये समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील जलसंकटावर 'वृक्षाधारित शेती'चा उपाय; 'जलयुक्त शिवार 3.0' मध्ये समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Pune : महिलांना शास्त्रीय गायनाचे शिक्षण देण्यात कै. वसंत पेंढरकर यांचे मोठे योगदान - प्राचार्य प्रमोद मराठे

Pune : महिलांना शास्त्रीय गायनाचे शिक्षण देण्यात कै. वसंत पेंढरकर यांचे मोठे योगदान - प्राचार्य प्रमोद मराठे

Pune : आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळवण्यासाठी आधुनिक संशोधनाची गरज; डॉ. एस. सारंगपाणी यांचे मत

Pune : आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळवण्यासाठी आधुनिक संशोधनाची गरज; डॉ. एस. सारंगपाणी यांचे मत