महाराष्ट्रात पुढच्या काही तासांत कोसळणार मुसळधार पाऊस; IMD कडून हायअलर्ट जारी
Updated On:

मुंबई : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाट भागामध्येदेखील पावसाची शक्यता आहे.
विदर्भात देखील हवामान विभागाकडून मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, विजांच्या कडककडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नुसता पाऊसच पडणार नसून, पावसासोबत वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.





