Weather Update| देशासह राज्यात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. काही ठिकाणी तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर आता मे महिन्यात देखील उष्णतेची लाट काही भागात कायम राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील. कोकणासह मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट वातावरण राहील. दरम्यान, मे महिना उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने वाढत्या उष्णतेपासून काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता Weather Update| तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट तर मराठवड्यातील लातूर, उस्मानाबादला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे. तर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व नांदेडला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व तर पुढील काही दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारण दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. Weather Update| हेही वाचा: IPL 2024 (MI vs KKR Match 51) : मुंबईची आज कोलकाताशी टक्कर, सलग 3 पराभवानंतर हार्दिकची सेना पुनरागमन करणार का? प्लेऑफवर टांगती तलवार…