‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील 4 तास महत्त्वाचे; IMD जारी केला अलर्ट

मुंबई : मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने या भागात रेड अलर्ट जारी केला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला अलर्ट
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील काही तासात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.तसेच पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर, उद्याही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या जवळपास संपूर्ण राज्यभऱात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजेचे असल्यास घराबाहेर पडा असे आवाहनदेखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.





