Rahul Gandhi: ‘देशाला दाखवू खरा पंतप्रधान कोण’; राहुल गांधींच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Rahul Gandhi:

Rahul Gandhi: केरळमधील पेरांब्रा येथे झालेल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका करत मोठे विधान केले. “काळजी करू नका, काहीही झाले तरी काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींना पकडणारच. ते कितीही वेगाने किंवा कितीही दूर पळाले तरी शेवटी आम्ही त्यांना पकडू आणि देशाला दाखवू की खरे पंतप्रधान कोण आहेत,” असे गांधी म्हणाले.
VIDEO | Kerala Elections 2026: Addressing a public gathering in Perambra, Congress MP Rahul Gandhi (@RahulGandhi) says, “Don’t worry, please understand one thing. No matter what happens, Congress party is going to get Mr. Narendra Modi. He can run as fast as he wants, as far as… pic.twitter.com/G9M30cGmK7
— Press Trust of India (@PTI_News) March 31, 2026
याआधी कोट्टायम येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या एका करारामुळे शेतकऱ्यांचे हक्क कमी झाले आहेत. “पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांनी भारताची शेती आंतरराष्ट्रीय बाजारासाठी खुली केली आहे,” असा दावा त्यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प यांची परवानगी घ्यावी लागते –
ऊर्जा सुरक्षेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, या निर्णयामुळे भारताची ऊर्जा स्वायत्तता धोक्यात आली असून, आता देशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना स्वातंत्र्य उरलेले नाही. “भारताला तेल खरेदी करायचे असेल, तर आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची परवानगी घ्यावी लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
#WATCH | Keralam: LoP and Congress leader Rahul Gandhi addresses a public meeting in Kottayam
He says, “Mr Narendra Modi signed away the US deal, where he gave away the rights of our farmers. He is the first PM in the history of modern India, who has opened agriculture to the… pic.twitter.com/ek56Rnzn4m
— ANI (@ANI) March 30, 2026
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे येत्या काळात मोठा आर्थिक धक्का बसू शकतो, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. त्याचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, २४ मार्च रोजी सोशल मीडियावरही त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. भारताची परराष्ट्र नीती ‘कंप्रोमाइज्ड’ असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले होते की, “पंतप्रधान मोदी स्वतःच तडजोडीच्या स्थितीत आहेत. ते अमेरिका आणि इस्रायल सांगतील तसेच निर्णय घेतात. त्यामुळे ते देशहिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत, हे स्पष्ट दिसत आहे.”
देश की विदेश नीति आज compromised है, क्योंकि PM मोदी खुद compromised हैं।
मोदी सिर्फ़ वही करते हैं जो अमेरिका और इज़राइल उनसे करवाना चाहते हैं।
मोदी कभी भी भारत के हित के फैसले ले ही नहीं सकते – और ये साफ दिख रहा है। pic.twitter.com/fieCdr4RY0
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2026





