हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमध्ये.. विकास ठाकरेंनी संजय राऊत यांच्या दाव्याची उडवली खिल्ली

नागपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीतील जागावाटप यावरून महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. यादरम्यान नागपूर दौऱ्यावर असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नागपूर शहरातील पूर्व नागपूर या विधानसभा जागेवर आपल्या पक्षाचा दावा केला होता.
विकास ठाकरेंनी उडवली खिल्ली
आम्ही नागपूर शहरातील एकही जागा मित्र पक्षासाठी सोडणार नाही, असे काँग्रेसने ठणकावून सांगितले. 2019 साली विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार फक्त 4 हजार मतांनी पराभूत झाला होता. त्यामुळे दक्षिण नागपूरवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले.
मात्र, आमच्या पक्षात अंतिम निर्णय हायकमांडचा असतो. जर हायकमांड म्हणेल तर नागपूर शहरातील सहाच्या सहाही विधान जागा संजय राऊत यांच्या पक्षासाठी सोडू, असे विकास ठाकरेंनी संजय राऊत यांच्या दाव्याची खिल्ली उडवली.





