आघाडी धर्म पाळणारच; कॉंग्रेसचा निर्धार

विधानसभा निवडणुकीत आघाडीधर्माचे पालन करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी दिलेली जबाबदारी आपण सर्वांनी पाळावी, तसेच पक्षाच्या या कठीण काळात एकनिष्ठ राहून जोमाने काम करण्याचा निर्णय पुणे शहर कॉंग्रेसच्या बुधवारी झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी कॉंग्रेस भवन येथे ही बैठक झाली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ऍड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, रशिद शेख, सदानंद शेट्टी, निता राजपूर यांच्यासह नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, रमेश अय्यर, सचिन आडेकर उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या वतीने शिष्टाचार समिती, सोशल मीडिया समिती, प्रसिद्धी विभाग, नियंत्रण कक्ष, वक्ते समन्वयक, रणनिती व व्यूहरचना समिती, कायदा सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आघाडीतील मित्रपक्षांच्या बैठका घेऊन पुढील निर्णय घेण्याचे यावेळी निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय, या निवडणुकीत भ्रष्टाचार व विकासाच्या नियोजनाच्या अभावावर भाजपला प्रचारात घेरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×