इस्लामाबाद : मे महिन्यात बारताबरोबर झालेल्या चार दिवसांच्या संघर्षादरम्यान आपल्याला सुरक्षेसाठी बंकरमध्ये लपून बसण्यास सांगण्यात आले होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केला आहे. लष्करी सचिवालयाकडून आपल्याला तशी सूचना मिळाली होती. मात्र आपण ही सूचना मान्य करण्यास नकार दिला होता, असेही झरदारी यांनी म्हटले आहे. उलट भारत आणि पाकिस्तानमध्ये आगामी काळाय युद्ध होण्याची शक्यता असल्याचे आपणच चार दिवस आगोदर लष्करी सचिवांना सांगितले होते. पण तरिही आपल्याला बंकरमध्ये चलण्याचा आग्रह धरला गेला. त्यावर जर शहिद व्हायचेच असेल, तर या ठिकाणीच होऊ दे. मला बंकरमध्ये शहिद व्यायचे नाही. तर युद्धभूमीवरच व्हायचे आहे, असे उत्तर आपण सचिवांना दिले असल्याचे झरदारी म्हणाले. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान आणि झरदारी यांच्या पत्नी दिवंगत बेनझीर भुट्टो झरदारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बेनझीर भुट्टो यांची २००७ साली हत्या करण्यात आली होती. पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता देशासाठी शहिद होण्यासाठी तयार असल्याचेही झरदारी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या धमकीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. नूर खान हवाई तळ उद्ध्वस्त झाल्याची कबुली भारताने १० मे रोजी पहाटे पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला होता, असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूल केले आहे. दोन्ही देशांमधील चार दिवसांच्या सशस्त्र संघर्षानंतर आठ महिन्यांनी ही पहिलीच कबुली आहे. मे महिन्यातील संघर्षादरम्यान पाकिस्तान आणि भारत यांच्यात मध्यस्थीची विनंती पाकिस्तानने केली नव्हती, पण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असेही दार म्हणाले.