Shehnaaz Gill : “आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो”; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव
Shehnaaz Gill : व्हिडीओच्या शेवटी शहनाज 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडते.

Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिलने ‘बिग बॉस 13’ नंतर बॉलीवूड इंडस्ट्रीत मोठे यश मिळवले. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र अलिकडेच तिने सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शहनाजने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शहनाज विमानात प्रवास करत असल्याचं दिसत आहे.
या विमानात काही बिघाड किंवा हवामानामुळे परिस्थिती थोडी बिकट झाल्याने शहनाजसह इतर प्रवासीही घाबरले असल्याचं दिसत आहे. पण सुरक्षित लँडिंगनंतर तिला दिलासा मिळाला. अशातच शहनाज गिल ‘वाहेगुरू वाहेगुरू’ असा जप करताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी अभिनेत्री ‘गणपती बाप्पा मोरया’ असं म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडते. (Shehnaaz Gill)
दरम्यान, व्हिडीओ शेअर करत तिने ‘आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो आहे. आम्ही सुरक्षितपणे उतरलो, याचा मला आनंद आहे. धन्यवाद वाहेगुरू’, असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. (Shehnaaz Gill)
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, या विमान प्रवासात शहनाजसोबत तिचा भाऊ शहबाज बदेशा देखील होता. व्हिडीओमध्ये दोघेही विमानात दिसत आहेत. टर्ब्युलन्समुळे काही काळ भितीदायक वातावरण निर्णाण झालं असलं तरी अखेर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे किंवा कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. (Shehnaaz Gill)
शहनाजच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच ती ‘इश्कनामा’मध्ये दिसली. तिने गिप्पी ग्रेवालसोबत ‘सिंग व्हर्सेस कौर २’ या पंजाबी चित्रपटातही काम केले आहे. आता ती दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांच्यासोबत ‘रन्ना च धन्ना’ या आगामी पंजाबी चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा:





