कोयना धरणातून मंगळवार सकाळपासून पाणी सोडणार; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

कोयनानगर (विजय लाड) – कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सर्वदूर धुवांधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून (Koyna Dam) उद्या (दि. २३) मंगळवार सकाळपासून पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय कोयना धरण प्रशासनाने जाहीर केला आहे.
कोयना नदीपात्रात १०५० क्युसेक्स पाणी सोडणार
मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यान्वित करून त्यातून 1050 क्यूसेक् इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळं कोयना नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे
धरणातील पाणीसाठा ६२.७६ टीएमसी
कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६२.७६ टीएमसी झाला आहॆ. कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना प्रशासनाने दिला आहे.
ही बातमी वाचा – कोयना धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा



