तळेगांव दाभाडे – पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे जॅकवेल मधील ट्रान्सफॉर्मरचे ऑइल टॉप अप करणे, विद्युत केबल बदलणे व विद्युतविषयक इतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता गुरुवारी (दि. १४) रोजी सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत संपूर्ण गाव भाग व स्टेशन भागातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक दरम्यानच्या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.