पुणे : आंबेगाव पठार व धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे येत्या गुरुवारी (२६ जून) काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार सर्व्हे नं. १५ ते ३०, धनकवडी सर्व्हे नं. २८,२९,३०,३४ ते ३७, चैतन्यनगर, अक्षयनगर, राजमुद्रा सोसायटी, रक्षा सोसायटी, विद्यानगरी, मोहननगर इत्यादी.