Water Supply : पंपिंग स्टेशनला आता ‘सॉफ्ट स्टार्टर’चा आधार; पाणीपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड थांबणार?
Water Supply : पंपिंग झोनमधील विविध पंपहाऊसमध्ये बसविले जाणार सॉफ्ट स्टार्टर; तांत्रिक कार्यक्षमता वाढवून पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न.
Updated On:

Water Supply – शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाने पंपिंग झोन अंतर्गत विविध पंपहाऊसमध्ये सॉफ्ट स्टार्टर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेनुसार मे. आदेश इलेक्ट्रिकल अँड कॉन्ट्रॅक्टर्स या ठेकेदाराची निविदा सुमारे २०.६० टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे.
या निविदेचा अंदाजित खर्च ३३ लाख हजार रुपये असताना मंजूर दरानुसार सुमारे २६ लाख ९० हजार ९९८ रुपयांपर्यंत काम करण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदार नियोजित कालावधीत काम पूर्ण करण्यास सक्षम असल्याने प्रशासनाने ही निविदा मंजूर केली आहे. काम करताना सर्व शासकीय नियमांचे पालन, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी तसेच निविदेतील अटींचे पालन बंधनकारक राहणार आहे.
तसेच, मटेरियलच्या किमतीत बदल झाल्यास त्यानुसार दर समायोजनाची तरतूदही करण्यात आली आहे. या कामामुळे पंपिंग यंत्रणांची कार्यक्षमता वाढून पाणीपुरवठा अधिक सुरळीत व विश्वासार्ह होण्यास मदत होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





