Water Scarcity: शहरावर भीषण पाणीसंकट! महापौर रवी लांडगे यांचा मोठा निर्णय; ‘या’ गोष्टींवर तात्काळ आणली बंदी
Water Scarcity: एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा शिल्लक.

Water Scarcity – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. त्यातच एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असल्याने पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने धरणातील पाणीसाठा उपसण्यावर बंदी घातली असून फक्त पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. तर, पाऊस आणखी लांबला तर शहरात पाण्याचे संकट आणखी भीषण होणार आहे. गतवर्षी मे महिन्यामध्ये पावसाला सुरूवात झाली होती.
तर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस चांगला बरसल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही. शहराला पवना, आंद्रा आणि एमआयडीसीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी गळती होत असल्यामुळे पहिलेच शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. असे असताना आता पाऊस लांबल्याने शहरातील नागरिकांवर पाणीकपातीचे मोठे संकट उभे राहिले आहे. पाण्याची बचत करण्यासाठी शहरातील जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापौर रवि लांडगे यांनी दिले आहेत.
गतवर्षी यावेळी धरणांमध्ये चांगला पाणीसाठा होता. आता पवना धरणामध्ये अवघा २१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पाऊस नाही पडला तर शहरातील पाणीपरिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे जलतरण तलाव, वाशिंग सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– रवि लांडगे, महापौर.





