Solapur water crisis : सोलापूरात पाणीटंचाईचे संकट गडद; २१२ गावांना २६० टँकरने पाणीपुरवठा!
टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ५२ विहिरी आणि ४२ बोअरवेल असे एकूण ९४ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत

Solapur water crisis – सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता कायम असून २१२ गावे आणि ११९० वाड्यांमधील ४ लाख ९६ हजार ५९९ नागरिकांसह १ लाख ७३ हजार ९४३ पशुधनाला २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ५२ विहिरी आणि ४२ बोअरवेल असे एकूण ९४ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक ४६ गावांना ६८ टँकर, तर सांगोला तालुक्यातील ४१ गावांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
अक्कलकोटमध्ये २९ गावांना १९, माढा १९ गावांना २४, बार्शी १८ गावांना ८, करमाळा १८ गावांना १६, माळशिरस ११ गावांना ११, उत्तर सोलापूर ९ गावांना १६, दक्षिण सोलापूर ९ गावांना १४, मोहोळ ११ गावांना १८ आणि पंढरपूरमधील एका गावाला एका टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड यांनी दिली.






