Water Polo Katakkar Trophy : वेस्टर्न रेल्वे, इंडियन नेव्ही अंतिम फेरीत…

पुणे – डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वे व इंडियन नेव्ही या संघांनी कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) व ईस्टर्न रेल्वे या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात वेस्टर्न रेल्वे संघाने कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाचा १४-९ असा पराभव अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तिसऱ्या क्वार्टर अखेर दोन्ही संघानी तोडीस तोड खेळ केला व त्यामुळे सामन्यात ८-८ अशी बरोबरी निर्माण झाली.
अखेरच्या सत्रात वेस्टर्न रेल्वेच्या सारंग वैद्य याने तीन सलग गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. वेस्टर्न रेल्वे संघाने शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखत सी एसए संघाविरुद्ध १४-९ असा विजय मिळवला. वेस्टर्न रेल्वे संघाकडून सारंग वैद्यने सर्वाधिक ९ गोल केले. तर, कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए)कडून सौमेन मोंडलने ३ तर सोविक ढालीने २ गोल केले.





