Water Dam Level : उष्णतेची झळ! महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट वाढतेय; धरणांमधील साठा अर्ध्यावर

Water Dam Level : दरवेळी होळीनंतर तापमानात वाढ होते. मात्र, यंदा होळीच्या अगोदरच तापमानात मोठी वाढ बघायला मिळाली. आता तर सातत्याने पारा वाढ आहे. मार्च महिन्यातच हवामान खात्याकडून तीनवेळा उष्णतेच्या लाटेचा इशारा हा देण्यात आलाय.
मुंबई आणि पुण्यात नागरिकांना उष्णतेने नको नको करून सोडले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वरच जाताना पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सूर्याने आगच ओकली असल्याचे दिसून येत आहे.
अश्यातच, आता राज्यातल्या सुमारे तीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा 52 टक्क्यांवर आला असल्याचं संगणयत आलं आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याची मागणी वाढली असून धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.
पावसाळ्यास अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर नागरिकांना राहावे लागणार आहे. धरणातील पाणीसाठा खूप कमी झाल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत एकूण ४२ टक्के म्हणजेच ६ लाख १६ हजार ५५४ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, राज्यातील धरणांचा १५ मार्चपर्यंत पाणीसाठा किती आहे यावर देखील आपण एक नजर टाकुयात…. (एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल आकडेवारी जायीर केली आहे.)
कोयना – ६३.६४ टक्के
तिलारी – ४४.२३ टक्के
गंगापूर – ७१.४२ टक्के
जायकवाडी – ६२.१७ टक्के
राधानगरी – ६५.०७ टक्के
पानशेत – ५५.०८ टक्के
खडकवासला – ७०.०१ टक्के
विभागीय पाणीसाठा :
नागपूर – ४८.८३ टक्के
अमरावती – ५७.३९ टक्के
नाशिक – ५२.८९ टक्के
पुणे – ५२.२२ टक्के
कोकण – ५७.६३ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ५१.११ टक्के





