Water Cut : ‘या’ जिल्ह्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट; पाणी कपात लागू होणार !
नैऋत्य मान्सूनच्या आगमनास होणाऱ्या विलंबामुळे जून आणि जुलै महिन्यांत दर शनिवारी पाणी कपात लागू केली जाईल.

Water Cut – पाऊस आणि धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे नाशिक महापालिकेने पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी नागरिकांना २० जूनपासून पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
नैऋत्य मान्सूनच्या आगमनास होणाऱ्या विलंबामुळे जून आणि जुलै महिन्यांत दर शनिवारी पाणी कपात लागू केली जाईल. याव्यतिरिक्त, ऑगस्ट महिन्यात दर दोन दिवसांनी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर धरण समूह आणि मुकणे धरणातून दररोज सरासरी ६०० एमएलडी पाणी उचलले जाते.
शहरात असलेल्या सात जलशुद्धीकरण केंद्रांवर या पाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर १३४ पाण्याच्या टाक्या व २,५०२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे त्याचे वितरण केले जाते.






