पुणे हडपसर परिसरात पाणी संकट

पुणे, दि. 14 -पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणारी 1200 मि. मी. व्यासाच्या जुन्या जलवाहिनीला गळती निर्माण झाली आहे. दांडेकर पुलाजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोर सुरू असलेल्या महापालिकेच्या रस्त्याच्या कामात ही गळती असल्याचे समोर आले आहे. या गळतीचे प्रमाण मोठे असल्याने महापालिकेकडून येत्या रविवारी (दि. 16) ही गळती रोखण्यासाठी तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी हडपसर भागात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ही जलवाहिनी बंद केली जाणार असली तरी लष्कर जलकेंद्रासाठी पूर्वी प्रमाणेच कालव्याद्वारे पाणी घेऊन हडपसर भागात पाणी देण्याचे नियोजन पालिकेने केले असले तरी, हे पाणी कमी दाबाने येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्रासाठी 1600 मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाते. दांडेकर पुलाजवळ असलेल्या रस्त्यावर महापालिकेच्या पथ विभागाकडून नाल्यावरील कल्वर्टचे काम सुरू असून, या कामासाठी जेसीबीद्वारे खोदाई करण्यात आली आहे. मात्र, हे काम सुरू असताना शुक्रवारी सकाळी लष्कर जलकेंद्राकडे जाणाऱ्या या मोठ्या वाहिनीतून मोठया प्रमाणात पाणी गळती समोर आली. हे काम तातडीनं करण्यासाठी महापालिकेस 12 ते 14 तासांचा कालावधी लागणार आहे. मात्र, शुक्रवारी तसेच शनिवारी ते शक्य नसल्याने रविवारी दिवसभर हे काम केले जाणार आहे.
या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता
लष्कर पाणीपुरवठा विभागाकडील बी. टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, संपुर्ण हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, मुंढवा, केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजू, 15 नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावीवस्ती, शंकरमठ, वैदुवाडी, आनंदनगर, रामनगर, वानवडी, साळुंके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर, जांभुळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू. एस. व्ही.नगर, शांतीनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपुर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी पार्ट, संपुर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव.





