Esha DeoL | Ajay Devgan | बॉलीवूडमध्ये काही मोजक्याच पण चांगल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू करणारी अभिनेत्री म्हणून ईशा देओलनेचे नाव घेतले जाते. २००० च्या काळात अभिनेत्री ईशाने अनेक चित्रपटांमधून अभिनय केला. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अभिनेत्यांशी तिचे नाव जोडले गेल्यावर तिने याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्रीने अजय देवगण सोबतच्या तिच्या नात्याबद्दलही स्पष्टच बोलली आहे. अभिनेत्री ईशा देओल सध्या तिचा आगामी चित्रपट ‘तुमको मेरी कसम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने अनेक सहकलाकारांसोबत काम केले आहे. तर तिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेल्यावर तिने याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अजय देवगणला डेट करण्याच्या मुद्द्यावरही तिने आपली बाजू स्पष्ट केली आहे. अभिनेत्रीने द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिचे नाव तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक सहकलाकारांसोबत तिचे नाव जोडले गेले होते. त्यावर ती म्हणाले की, काही गोष्टी खऱ्या असू शकतात, पण अनेक पूर्णपणे बनावट आहेत. तिचे नाव अजय देवगणसोबतही जोडले गेले होते. मात्र, त्यांच्यात परस्पर कौतुक आणि आदर याशिवाय कोणतेही नाते नसल्याचा खुलासा तिने या मुलाखती दरम्यान केला आहे. अभिनेता अजय देवगणसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना ईशा देओल म्हणाली की, दोघांचे नाते खूप सुंदर आणि वेगळे आहे. त्यांचे नाते प्रेम, कौतुक आणि एकमेकांबद्दल आदराने भरलेले आहे. त्यावेळी दोघांनी अनेक चित्रपट केले होते, यामुळे लोकांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक किस्सेही केले होते. ईशा देओल ही ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी आहे. ईशाने 2002 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. ‘कोई मेरे दिल से पूछे’ हा तिचा पहिला चित्रपट होता. गेल्या काही वर्षांत ईशा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता ती तब्बल14 वर्षांनंतर ‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे, हा चित्रपट 21 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.