मुंबई – सोमवारपासून राज्यात मराठवाड्यासह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये वादळासारखी हालचाल आढळली आहे. ही हालचाल अधिक व्हायला लागल्यामुळे महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपासून पावसाची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ शुभांगी भुते यांनी सांगितले.
विदर्भामध्ये सर्वप्रथम पावसाची शक्यता आहे. या पावसाची व्याप्ती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या पूर्वेपासून पश्चिम टोकापर्यंत असणार आहे. यातील 1-2 ठिकाणी अतिजोरदार पाऊस होण्याचीही शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रासह पालघर, ठाणे आणि मुंबई या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्येही मुुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.