Pimpri | अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट

वडगाव मावळ, – वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व १२ अंगणवाडी येथील सर्व ४५५ विद्यार्थी विद्यार्थिनींना मावळ विचार मंच, जैन संघ आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या माध्यमातून उबदार स्वेटर भेट देण्यात आले.
मावळ विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते, मावळ विचार मंचचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, लायन्स क्लब ऑफ वडगावचे संस्थापक अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, अध्यक्ष प्रशांत गुजराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.
वडगाव गावठाण, मधुबन, भिलारे वस्ती, मोरया कॉलनी, ठाकर वाडी, मिलिंद नगर, श्री खंडोबा मंदिर जवळ, केशव नगर, बाजारपेठ, चव्हाण वाडा, माळी नगर, कातवी या वडगांव नगरपंचायत हद्दीतील सर्व १२ अंगणवाडी मधील सर्व ४५५ विद्यार्थी विद्यार्थिनींना या उबदार स्वेटरची भेट देण्यात आली. सर्व अंगणवाडी मदतनीस तसेच पालक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. स्वेटरची भेट मिळाल्यामुळे मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद व्यक्त होत होता.





