शिक्रापूर : सध्या कार्तिकी एकादशी मुळे राज्य भारतून वेगवेगळ्या ठिकाणचे वारकरी आळंदीकडे येत असतात मात्र आळंदी हे शिरूर तालुक्याचे जवळ असल्याने अनेक गावांमध्ये वारकऱ्यांचा मुक्काम होतो मात्र शिरूर तालुक्यात मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांनी बिबट्यांपासून विशेष काळजी घ्यावी असे आवाहन शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे. शिरूर तालुक्यात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास येत आहे, रात्रीच्या वेळेस अनेक वाड्यावर त्यांवरील रस्त्यांवर बिबट्या दिसत असल्याचे उघड झाले आहे, मात्र सध्या कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदी कडे असंख्य दिंड्यांचे प्रस्थान झाले असताना काही दिंड्या व वारकरी हे रात्रीच्या सुमारास शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्काम करत आहे. तर अनेकदा दिंड्या ह्या परतीच्या मार्गावर असताना देखील वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी थांबत असतात मात्र दिंड्या मुक्कामी थांबत असताना त्या भागातील ग्रामस्थ व नागरिकांनी सदर दिंडी चालक व वारकऱ्यांना बिबट्या बाबतची माहिती देऊन त्यांना योग्य निवारा द्यावा तसेच वारकऱ्यांनी देखील बिबट्यांपासून स्वतःची काळजी घ्यावी रात्रीच्या वेळी कोठेही झाडां लगत शेतामध्ये झोपू नये व उजेडात वास्तव्य करावे जेणेकरून नागरिकांना बिबट्यापासून बचाव करणे शक्य होईल, त्यामुळे नागरिक व वारकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.