वारकऱ्यांनी घेतला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

युनिक मेडिकल फौंडेशन गेली १८ वर्षे पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांना पुणे व सासवड येथे मोफत औषधोपचार करीत असून, शनिवार २१ जून २०२५ या दिवशी जनवाडी येथील विर बाजीप्रभू प्रशाला दिंडी क्र २४, कर्वेनगर येथील महालक्ष्मी मंदिर दिंडी क्र २८०, व दत्तवाडी येथील त्रिमूर्ती निवास व सोमवार दि. २३ जून २०२५ रोजी सासवड येथील संत सोपान काका समाधी मार्गावरील जगताप बंधू यांच्या येथे पंढरीच्या वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच संस्थेमार्फत वारकऱ्यांना चहा व बिस्किट खाद्यपदार्थ याचे वाटप करण्यात आले.
या वर्षी १,६०० वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला यात एकूण १,२०० वारकऱ्यांना इंजेक्शन देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर लोखंडे, उपाध्यक्ष सुभेदार मोहन शेलार, कार्याध्यक्ष डॉ. राहुल लोखंडे, खजिनदार मानसी लोखंडे, सचिव नारायण फणसे, सहकार्याध्यक्ष डॉ. सुप्रिया लोखंडे, डॉ. दिनेश हेडगिरे, डॉ. गणेश खाडे, डॉ. ओमकार थेटे, डॉ. शिखा शर्मा, डॉ. प्रणाली मेमाने, डॉ. माधुरी जगताप वैशाली खंडागळे, वासंती कोयाळीकर, अक्षय नागरगोजे, केदार गोंजारी, रोहन किणिकर, संण्डे क्लब तर्फे सुनील भांडवलकर आणि त्यांची टीम, सैनिक शाळा सातारा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी उपयोगी औषधांची तसेच पेन किलर मलमांची मदत केली. जयवंत कुंभार यांचे आयुष फार्मा व विरपत्नी योगिता गिरीगोसावी यांचे कुणाल मेडिकल यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
बृहनमहाराष्ट्रात जिल्हा विभाग, प्रांत विभाग, क्षेत्र संघटनमंत्री महेंद्र नथुराम वेदक (दादा वेदक) या नांवाने संघ परिवारात देशभरात परिचीत अशा व्यक्तीची सदिच्छा भेट सासवडच्या मेडिकल कॅम्पला दिली. त्यांनी स्वतः थांबून वारकऱ्यांना सेवा दिली. तसेच संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.





