#wari2019 : वारकऱ्यांची तत्परता ! अॅम्बुलन्सच्या आवाज ऐकताच दिली वाट
Updated On:

फलटण – भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत दिंडी व पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी फलटण येथून प्रस्थान झाले आहे.
रस्त्यात रुग्णवाहिकेचा आवाज ऐकताच सर्व दिंड्यांनी लगेच वाट करून दिली. यामुळे वारीतील वारकऱ्यांची शिस्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. दरम्यान, पालखीचे पुढील मुक्काम बरड येथे असणार आहे.





