Schools Holiday : राज्यात उष्णतेचा तडाखा; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
Schools Holiday : वाढत्या उन्हामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाने १६ एप्रिल रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Schools Holiday : राज्यात तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार अर्ध्या महाराष्ट्रात हीट वेव्हची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. (Schools Holiday)
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना 16 एप्रिल 2026 रोजी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे.(Schools Holiday)
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आदेश काढत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले आहे. उष्माघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. Schools Holiday
दरम्यान, नागरिकांनीही उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Schools Holiday)




