‘War 2’ Film | सध्या ‘वॉर २’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यात अभिनेता हृतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे कलाकार मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्येच कियाराच्या बिकिनी सीनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. परंतु सेन्सॉर बोर्डाने कियाराचे बिकिनी सीन हटवले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ सिनेमाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने म्हणजे सीबीएफसीने प्रमाणपत्र देताना काही बदल सांगितले आहेत. तसेच काही सीन कट देखील करण्यात आले आहेत. मात्र ॲक्शन दृश्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार, CBFC ने निर्मात्यांना अश्लील संवाद बदलण्यास आणि एका पात्राने केलेल्या अश्लील हावभावाला काढून टाकण्यास सांगितले आहे. मेकर्सला सेंशुअल सीन्स 50 टक्के कापण्यास सांगितलं आहे. हे 9 सेकंदांचे सीन्स आहेत. ‘War 2’ Film | हे दृश्य म्हणजे सिनेमातील ‘आवन जावन’ गाण्यातील कियाराचे बिकिनी शॉट्स आहेत असं म्हटलं जात आहे. या बदलांनंतर ‘वॉर २’ला U/A सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. हा सिनेमा 2 तास 59 मिनिटांचा आहे. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग 10 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. येत्या 14 ऑगस्ट रोजी ‘वॉर २’ रिलीज होणार आहे. वॉर 2′ ची रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. ‘War 2’ Film | हेही वाचा : निवडणूक आयोगाकडून देशातील 334 पक्षांची नोंदणी रद्द; महाराष्ट्रातील 9 पक्षांचाही समावेश