वक्फ दुरुस्ती विधेयकावर मौलाना संतापले ; म्हणाले,”मुख्यमंत्री योगी खोटारडे”

Waqf Amendment Bill । केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाची देशभर चर्चा सुरू आहे. विविध मुस्लिम संघटना आणि नेते या विधेयकाला सतत विरोध करत आहेत. या संदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी देखील याविषयी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी,”वक्फ हे आपल्यासाठी सर्वकाही आहे आणि त्याचे नुकसान करणे म्हणजे सर्वकाही नुकसान करणे होय.” असे म्हणत या विधेयकाला विरोध दर्शवला आहे.
मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी ही मोठी गोष्ट सांगितली
मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी त्यांच्या विधानात, ‘वक्फ हेच सर्वस्व आहे. आमची मशीद, मदरसा, सगळं काही. वक्फचे नुकसान करणे म्हणजे सर्वकाही नुकसान करणे आहे. यामुळे मुस्लिमांचे नुकसान होईल आणि आम्हाला हे अजिबात मान्य नाही.” असे म्हटले आहे, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आवाहन Waqf Amendment Bill ।
मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी यावेळी, “आम्ही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना हे अजिबात स्वीकारू नये असे आवाहन करतो. आम्हाला आनंद आहे की सर्व विरोधी पक्ष याच्या विरोधात आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, योगींची खास संस्कृती बुलडोझर संस्कृती आहे. गुन्हेगारांच्या जमिनीवर बुलडोझर चालवले जातात. गुन्हेगाराची जमीन वक्फला देणे चांगले. ते पुढे म्हणाले की योगी खोटारडे आहेत. मुस्लिमांनी १२०० वर्षे राज्य केले पण कोणालाही कोणतीही समस्या आली नाही.” असे म्हणत योगींवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री योगी यांनी दिले होते मोठे विधान Waqf Amendment Bill ।
दरम्यान, मुख्यमंत्री योगी म्हणाले होते की, “पूर्वी वक्फने ज्या जमिनीवर स्वतःचा दावा केला होता, ती त्यांची स्वतःची जमीन झाली होती पण आता हे चालणार नाही. आता कोणीही वक्फच्या नावाखाली मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही. त्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक हे आजच्या काळाची गरज असल्याचे वर्णन केले होते.”
हेही वाचा
सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ ; तुमच्या शहरातील आजचे नवीनतम दर जाणून घ्या





