Monsoon Health Tips: पावसाळ्यात आरोग्य टिकवायचंय? जाणून घ्या कोणता आहार फायदेशीर आणि कोणता टाळावा !

Monsoon Health Tips: पावसाळा म्हणजे गारवा, चहा-भजी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद, पण याच काळात पचनशक्ती मंदावते, सर्दी-खोकला, अपचन, त्वचेचे विकार यांसारखे त्रास वाढतात. त्यामुळे या हंगामात खाण्यापिण्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य आहार पाळल्यास पावसाळ्यातही तुम्ही ताजेतवाने आणि निरोगी राहू शकता. या रिपोर्टमध्ये आपण पावसाळ्यातील योग्य आहार, टाळावयाचे पदार्थ आणि खास टिप्स जाणून घेणार आहोत.
* पावसाळ्यात काय खावं?
1. उकडलेले व गरम अन्न खा:
-उकडलेले भाज्या, पोहे, उपमा, मूग डाळीचे पदार्थ यामधून पचन सुलभ होतं.
-गरम अन्न पचनास मदत करतं आणि संसर्गाची शक्यता कमी होते.
2. हिरव्या पालेभाज्या (धुवून, शिजवून):
-मेथी, पालक, शेपू यांच्यातून आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
पण या भाज्या चांगल्या धुवून व नीट शिजवून खाव्यात.
3. हंगामी फळं खा:
-पेरू, सफरचंद, जांभूळ, पपई, पेरं, यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात.
-आंबट फळं टाळावीत, विशेषतः पाणी लागलेली असतील तर.
4. हळदयुक्त दूध किंवा चहा:
-हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे संक्रमणांपासून बचाव करतात.
5. जिरं, हिंग, आलं वापरा:
-पचन सुधारण्यासाठी आणि गॅस-अपचनापासून सुटका मिळवण्यासाठी हे उत्तम उपाय आहेत.
![]()
काय टाळावं?
1. भाजलेली आणि रस्त्यावरची अन्नपदार्थं:
-भजी, वडा, समोसा यांचा मोह झाला तरी टाळावं. यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त.
-रस्त्यावर मिळणारी चटणी, पाणी किंवा फळं टाळावीत.
2. थंड पेये आणि आइस्क्रीम:
-सर्दी, खोकला, घशातील सूज वाढू शकते.
3. कच्चं अन्न:
-सलाड, कच्ची फळं नीट न धुता खाणं धोकादायक ठरू शकतं.
4. जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न:
-पचनशक्ती मंद असल्याने अशा अन्नामुळे गॅस, अपचन, अॅसिडिटी होऊ शकते.
* पावसाळ्यातील ‘स्मार्ट’ आहार टिप्स
-‘हायजिन’ला सर्वोच्च प्राधान्य द्या: स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, भाज्या व फळं नीट धुवा.
-दिवसातून किमान एकदा गरम अन्न सेवन करा.
-ताजं आणि हलकं जेवा: जड अन्न टाळा.
-सूप, डाळी, खिचडी यांचा समावेश करा.
-प्रोबायोटिक फूड्स: लोणी काढलेलं ताक, लो फॅट दही, हे पचनासाठी उपयुक्त.
-पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच प्या.
* घरगुती उपाय
-आलं-हळद चहा: सकाळी एक कप घेतल्यास पचन सुधारतं आणि सर्दी टळते.
-हिंगाचं पाणी: अपचन, गॅससाठी फायदेशीर
-तुळस-पुदिन्याचा काढा: रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
पावसाळा हा बॅक्टेरिया आणि व्हायरस वाढण्याचा काळ असतो. त्यामुळे तुमच्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी पचनसंस्थेचं स्वास्थ्य जपणं गरजेचं आहे. खाणं हे केवळ चवीनं नव्हे, तर काळजीपूर्वक निवडून आणि स्वच्छतेचं पालन करत असावं.





