“भारतात येऊन चित्रपट करण्याची इच्छा”; प्रसिद्ध हॅालीवूड अभिनेत्याकडून बॅालीवूडवर कौतुकाचा वर्षाव

Tom Cruise : नुकताच जगप्रसिद्ध अभिनेता टॅाम क्रूझचा ‘मिशन इम्पॉसिबल- द फायनल रेकनिंग’ हा चित्रपट भारतात रिलीज झाला आहे. भारतात या चित्रपटाची मोठी क्रेझ असून एक आठवडा आधी हा चित्रपट भारतात रिलीज झाला आहे. तर अमेरिकेत हा चित्रपट पुढच्या आठवड्यात रिलीज होणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता टॅाम क्रूझने भारतीयांप्रती प्रेम व्यक्त करत बॅालीवूड चित्रपटांच कौतुक केले आहे. तसेच त्याने एक इच्छा देखील व्यक्त केली आहे. भारतात जाण्याची इच्छा असून तिथं एक मला चित्रपट बनवायचा आहे असे म्हणत तिथे जाऊन चित्रपट बनवण्यामागचे कारणही त्याने सांगितले आहे.
मला भारतीय चित्रपट, संस्कृती आवडत असल्याने मला एक भारतात येऊन चित्रपट करायची खूप इच्छा आहे. मुंबईत मी खूप ठिकाणं फिरलो असून त्या ठिकाणचा प्रत्येक क्षण मला आठवतो. त्या आठवणी आज सुद्धा माझ्या मनात आहेत. मी जेव्हा भारतात आलो होतो तेव्हा तिथे मी ताजमहल पाहिला, मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी फिरलो, भेटीगाठी घेतल्या, त्या आठवणी आज देखील माझ्या मनात आहेत, असे म्हणत टॅामने त्याच्या भारतात घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच भारत एक अद्भूत देश असून तिथली संस्कृती खूप कमाल आहे. ‘मै आप सबसे बहुत प्यार करता हूँ’ म्हणत त्याने भारताप्रती प्रेमही व्यक्त केले आहे. टॉम क्रूझचा मिशन इम्पॉसिबल चित्रपट पहिल्यांदा 1996 साली रिलीज झाला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या ७ श्रृंखला रिलीज झालेल्या आहेत. आता 2025 मध्ये या चित्रपटाच्या श्रृंखलेतील 8 वा भाग प्रदर्शित झाला आहे.
बॅालीवूड चित्रपट आवडतात कारण….
भारतातील चित्रपट मला खूप आवडतात. त्या चित्रपटातील कलाकरांचा अभिनय खूप भारी असतो. ते चित्रपटात गाणी गातात, नृत्य करतात. ते मला फार आवडतं. एखादा सीन सुरू असताना अचानक अभिनेता नृत्य करायला लागतो हे मला खूप भारी वाटतं. त्यामुळे मला एकदातरी भारतात चित्रपट करायची इच्छा आहे, असे टॅाम म्हणाला.





