Peth News : पेठमध्ये ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात
Peth News : वाळवा तालुक्यातील पेठ येथे विजयादशमी दसऱ्यानिमित्त पारंपरिक आणि ऐतिहासिक सीमोल्लंघन उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

Peth News : पेठ तालुका वाळवा येथील गोळेवाडी फाटा येथे पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिणेकडून आलेल्या श्री बिरोबा देवाच्या पालखीची, पेठ गावातून आलेल्या श्री मारुती, श्री माणकोबा व श्री खंडोबा यांच्या पालख्यांशी भेट झाली. (Peth News)
गुलाल व भंडाऱ्याची उधळण होऊन ढोल-कैताळाच्या गजरात ग्रामस्थांनी एकमेकांना सोने देऊन सोनं लुटले. महिलांनी पालख्यांचे औक्षण करून देवांचे दर्शन घेतले आणि दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला. (Peth News)
वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार पेठ येथील प्रसिद्ध श्री माणकेश्वर मंदिर, श्री खंडेश्वर मंदिर व श्री मारुती मंदिरातून प्रथम बाजारपेठेजवळ श्री मारुतीची पालखी येते. त्यानंतर श्री खंडोबाची पालखी येते. दोन्ही पालख्या श्री माणकेश्वर मंदिराजवळ पोहोचतात. (Peth News)
तेथे श्री माणकेश्वराची पालखी श्री मारुती व श्री खंडोबा यांच्या पालख्यांना भेटते. त्यानंतर श्री माणकोबा, श्री खंडोबा व श्री मारुती यांच्या पालख्या गोळेवाडी फाट्यावर श्री बिरोबा देवाला भेटण्यासाठी निघतात. (Peth News)
पेठ-शिराळा राज्यमार्गाजवळील गोळेवाडी फाट्यावर पेठ गावातून तिन्ही पालख्या येतात. दक्षिणेकडून सुमारे एक किलोमीटर अंतरावरून बिरोबा मंदिरातून ढोल-कैताळाच्या गजरात श्री बिरोबा देवाची पालखी निघते. (Peth News)
यावेळी “बिरोबाच्या नावानं चांगभलं,” “खंडोबाच्या नावानं चांगभलं,” “माणकोबाच्या नावानं चांगभलं,” “मारुतीच्या नावानं चांगभलं” अशा उद्घोषणांसह देवांचा गजर केला जातो. (Peth News)
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळेवाडी फाट्यावर श्री बिरोबा देवाची पालखी, पेठमधून आलेल्या श्री खंडोबा, श्री माणकोबा व श्री मारुती यांच्या पालख्यांना भेटते. यावेळी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करून सीमोल्लंघन साजरे केले जाते. (Peth News)
पेठ, जांभूळवाडी व वाघवाडी येथील ग्रामस्थ व महिलांनी सर्व पालख्यांचे दर्शन घेतले. ग्रामस्थांनी एकमेकांना सोने देऊन सीमोल्लंघन साजरे केले. याप्रसंगी ढोल व कैताळाचा जल्लोष असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. (Peth News)
सीमोल्लंघनानंतर सर्व पालख्या पेठ गावातील प्रमुख मार्गावरून निघाल्या. यावेळी गावातील महिलांनी सर्व पालख्यांचे औक्षण करून देवांचे दर्शन घेतले. यानिमित्ताने पालख्यांच्या समोर गोंधळ, वाघ्या-मुरळ्या तसेच ओव्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. (Peth News)





