Walmik Karad Mother । बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचेसंपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावरही मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, यासाठी देशमुख कुटुंबीय प्रशासनाकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या आईने या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘माझ्या मुलाला न्याया द्या’ म्हणत वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. माझ्या मुलाला न्याया द्या’ Walmik Karad Mother । संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. “आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे” अशी मागणी पारुबाई कराड यांनी केली आहे.. 75 वर्षांच्या पारुबाई कराड या सकाळपासून पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झालाय असे म्हणत ‘माझ्या मुलाला न्याया द्या’ असे त्यांनी म्हटले. माझ्या लेकाला अडकवलं जातंय Walmik Karad Mother । लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करणाऱ्या पारुबाई यांनी,”राजकीय सूडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. “माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही” असेही पारुबाई कराड यांनी म्हटले. दरम्यान, वाल्मिक कराडला याआधी 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज वाल्मिक कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.