Walmik Karad । बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. कारण वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात सीआयडीची 14 दिवसांची कोठडी संपल्यानंतर एसआयटीच्या ताब्यात असून सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सध्या बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याचदरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. ‘त्या’ दोन जवळच्या व्यक्ती परदेशात Walmik Karad । गेल्या काही दिवासांआधी वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले होते. या जप्त केलेल्या मोबाईलमधील काही सिमकार्ड विदेशात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच या सिमकार्डवरुन काहीजणांना फोनही गेल्याचे सांगितले जात होते. आता विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. वाल्मिक कराडचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील परदेशात पळून गेली असल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागली आहे. वाल्मिकची जवळच्या नातेवाईकाच्या नावे परदेशात गुंतवणूक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सीआयडीकडून कराडची परदेशात काही संपत्ती आहे का? याचा आता शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता किरण पाटील करणार Walmik Karad । संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करणार आहे. अनिल गुजर यांच्याकडील तपास आता किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास त्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी रॅंकच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येतो. त्यानुसार हा तपास आता डीवायएसपी रॅंक असलेल्या किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हेही वाचा “ती माझी बहीण, काही व्हिडिओ-फिडिओ सापडणार नाही, लई धुतल्या तांदळासारखं मी जगलेलोय” ; सुरेश धसांचे ‘त्या’ आरोपांवर भाष्य