व्हाट्सअॅपवर धमकीचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सूरज कांबळेला वालचंदनगर पोलिसांकडून अटक

इंदापूर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील व्हाट्सअप वर तलवारीसह धमकीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सूरज कांबळे (वय 31 वर्षे, रा. अशोकनगर, वालचंदनगर) येथून ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंणगे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सूरज कांबळे हा व्हाट्सअॅपवर तलवारीसह धमकी देत असल्याचे व्हिडिओ व्हायरल करून लोकांमध्ये दहशत पसरवत आहे. हे समजताच त्यांनी तपास पथकातील पो.कॉ. विक्रमसिंह जाधव, पो.ना. जगदीश चौधर यांना तात्काळ कारवाई करून आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलिसांनी आरोपीकडून एक तलवार देखील जप्त केली.
सदरची कामगिरी ही वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. विक्रमसिंह जाधव, पो. ना. जगदीश चौधर, पो. कॉ. कळसकर, पो.कॉ. बेलदार, पो. हवा. स्वामी यांनी केली आहे.





