जुन्नर शहरात फक्त प्रतीक्षाच
Updated On:

जुन्नर – जुन्नर शहरात नागरिकांना आजही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे फक्त प्रतीक्षाच करावी लागली. मेघगर्जनेसह ढग दाटून आल्यामुळे दमदार पाऊस पडेल, अशी आस बाळगून असलेल्या नागरिकांची निराशा झाली. यावेळी शहर परिसरात प्रचंड हवा सुटली. नुसता धुळच धूळ दिसून येत होता. मात्र, पुन्हा एकदा वरुणराजाने हुलकावणी दिली. गेल्या तीन दिवसांपासून जुन्नर शहरात ही परिस्थिती आहे. नागरिक, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.





