वाघोली: पुणे-नगर रस्त्यावर भोंग्याद्वारे वाहतूक नियंत्रण

वाघोली- पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली पोलीस स्टेशन अंतर्गत केसनंद फाटा, आव्हाळवाडी फाटा, बकोरी फाटा, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर फाटा लोणीकंद, फुलगाव फाटा, पुणे ग्रामीण मध्ये शिक्रापूर चौकात वाहतूक नियंत्रण करणारे भोंगे स्वखर्चाने बसवून संपत गाडे यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श उभा केला आहे.
पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी संपत गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना मदत करून गेले दहा ते बारा वर्ष वाहतूक कोंडी मुक्त परिसर करण्याचा प्रयत्न केला होता. समाजसेवक संपत गाडे यांनी लाख मोलाच्या खर्चातून ठिकठिकाणी बसवलेल्या भोंग्याद्वारे वाहतूक कोंडी नियंत्रण करण्यात पोलिसांना यश येऊ लागले आहे.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गाडे यांना या उपक्रमाबद्दल नागरिक भर रस्त्यात भेटून त्यांचे कौतुक करत आहे. संपत गाडे यांचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सेलिब्रिटी प्रमाणे त्यांची क्रेझ वाढू लागली असून लवकर घरी जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यांना हात उंचावून त्यांना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढून नागरिक कृतज्ञता व्यक्त करू लागले आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शासनाच्या पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे संपत गाडे यांनी सांगितले आहे.
“पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उभे राहून मदत करून नागरिकांना घरी लवकर जाण्यासाठी सहकार्य करणाऱ्या, स्वखर्चाने भोंगे उपलब्ध करून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या संपत गाडे यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. समाजशील व्यक्तिमत्व म्हणून आबांची ओळख निर्माण झाली आहे.” – दत्तात्रय गोते पाटील (संस्थापक, महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे)





