वाघोली: शिरसवडी गोते मळा ट्रांसफार्मर एक महिन्यापासून रखडला; शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

वाघोली – शिरसवडी गोते मळा तालुका हवेली येथील ट्रांसफार्मर एक महिन्यापासून जळाला असून एक महिन्यापासून मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी महावितरणच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात उभा राहिला आहे.
शिरसवडी गोते मळा या भागातील जवळपास 30 ते 40 लोकांसाठी शेती साठीचा ट्रांसफार्मर जास्तीच्या वीज भारामुळे दोन वेळा जळाला असून यामुळे शेतकऱ्यांचे विजेअभावी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणच्या मुख्य अभियंता ते उपअभियंता पर्यंत सर्व अधिकाऱ्यांना याबाबत फोनद्वारे व लेखी निवेदनाद्वारे कळून देखील ट्रांसफार्मर बसत नसल्याने नागरिक महावितरणच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात आले आहेत. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे महावितरणकडून तातडीने ट्रांसफार्मर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणारे एकमेव आमदार असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र शिरसवडी गोते मळ्यात ट्रांसफार्मर बसत नसल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.
“बाबरीकर साहेबांबरोबर बोलणे झाले असून सोमवारी ट्रांसफार्मर बसवण्यात येईल.”
– प्रदीप सुरवसे (उपकार्यकारी अभियंता उरळी कांचन)
“शिरसवडी गोते मळा याठिकाणी असणाऱ्या ट्रांसफार्मर बाबत महावितरणच्या मुख्य अभियंता तालेवार व इतर अधिकारी वर्गासोबत वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून देखील ट्रांसफार्मर वेळेत बसवत नसल्याने तसेच अतिरिक्त भारामुळे वारंवार ट्रांसफार्मर जळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांसाठी जास्तीच्या वीज भाराचा ट्रांसफार्मर बसवण्यात यावा. महावितरण कडून योग्य ती दखल तातडीने घेतली नाही तर आंदोलन करण्यात येईल.”
– सुधिर गोते (माजी सरपंच, बिवरी)
दोन वर्षापासून ची मागणी प्रलंबित
वाघोलीशिरसवडी गोते मळा येथील शेतकऱ्यांनी जास्तीचा वीस भार असणारा शेतीचा ट्रांसफार्मर बसविण्याबाबत महावितरणकडे मागणी केली आहे गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांकडून जास्तीच्या वीज भार असणाऱ्या ट्रांसफार्मर ची मागणी होत आहे परंतु महावितरणकडून जास्तीचा वीज भार असणाऱ्या ट्रांसफार्मर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे





