Wagholi News : वाघोली आणि केसनंदमध्ये कोयत्याचा धाक दाखवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; चौघांवर स्वतंत्र गुन्हे दाखल
Wagholi News : वाघोली आणि केसनंद परिसरात कोयता जवळ बाळगणे तसेच कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याच्या घटनांविरोधात वाघोली पोलिसांनी कठोर पावले उचलत मोठी कारवाई केली आहे.

Wagholi News : वाघोली आणि केसनंद परिसरात कोयता बाळगणे तसेच कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याच्या घटनांविरोधात वाघोली पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये एका तडीपार आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला आणि अन्य दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या चौघांकडून कोयते जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Wagholi News)
तडीपार आरोपीकडून कोयता जप्त
वाघोलीजवळील वडजाई रोडवरील डोमखेल परिसरात दत्त मंदिराजवळ कोयता बाळगणाऱ्या आकाश वायकर (रा. पेरणे फाटा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वायकर याला ऑगस्ट 2026 पासून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. पेट्रोलिंगदरम्यान तो पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. (Wagholi News)
याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1, 2, 3) सह 135 नुसार वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wagholi News)
बाईफ रोडवर कोयता फिरवून दहशत
वाघोलीतील बाईफ रोडवरील सातव स्पोर्ट्सजवळील मोकळ्या मैदानात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या विठ्ठल लांडगे (रा. वाघोली) याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले असता, त्याने पोलिसांना पाहून हवेत कोयता फिरवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कोयता जप्त केला. (Wagholi News)
याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1, 2, 3) सह 135 आणि फौजदारी कायदा कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wagholi News)
अल्पवयीन मुलाकडून कोयता जप्त
वाघोली-केसनंद रोडवरील जोगेश्वरी हायस्कूल बसथांब्याजवळ हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलावरही पोलिसांनी कारवाई केली. लोणीकंद येथील बकोरी रोड परिसरात राहणाऱ्या या मुलाकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1, 2, 3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wagholi News)
केसनंदच्या तरुणावरही कारवाई
याच परिसरातील जोगेश्वरी हायस्कूल बसथांब्याजवळ कोयता घेऊन फिरणाऱ्या प्रिन्स लोहाळे (रा. केसनंद) याच्यावरही वाघोली पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1, 2, 3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली आणि केसनंद परिसरात कोयते बाळगून फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या सलग कारवायांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. (Wagholi News)





