Wagholi News : पंचायत समितीच्या माजी सभापती संजीवनी कापरे यांचा भाजपात प्रवेश
Updated On:

वाघोली : पूर्व हवेली तालुक्यातील हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती संजीवनी कापरे यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.त्यांचा पक्षप्रवेश हा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल,भाजपा महामंत्री राजेश पांडे, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे,प.महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे,भाजपा क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप भोंडवे, भाजपा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे,भाजपा कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे,भाजपा महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषद सदस्य जयश्री पलांडे, शिवाजीराव भुजबळ,दशरथ वाळके,दत्ताआबा वाळके,संतोष गायकवाड, भगवानराव घोलप इतर मान्यवर उपस्थित होते.





