Wagholi Murder : वाघोली हत्या प्रकरण! बादल शेख याचा खून करणारे तिघे अटकेत

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – वाघोली येथील प्यासा बार समोर रविवारी (दि.५) मध्यरात्री वादावादीनंतर बादल शेख याचा लोखंडी हत्याराने तसेच डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या तिघांना वाघोली पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली आहे.अक्षय बाबू पटेल (२४, रा. आपलेघर, खराडी), मयुर रामकिसन वडमारे (२२, रा. खुळेवाडी, चंदननगर) आणि प्रदीप रघुनाथ जाधव (२३, रा. आपलेघर, खराडी) यांना अटक करण्यात आले आहे.
वाघोली-उबाळेनगर परिसरातील प्यासा बारसमोर मित्रांमध्ये झालेल्या वादातून बादल शेख याचा मित्र अक्षय पटेल, मयुर वडमारे आणि प्रदीप जाधव यांनी त्याच्यावर लोखंडी हत्यार व दगडांनी डोक्यात ठेचून खून केला निघून खून केला होता. हत्येनंतर वाघोली व खराडी परिसरामध्ये खळबळ उडाली होती. खून केल्यानंतर तिघेजण फरार झाले होते. या घटनेनंतर वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर खराडी व दापोडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ सापळा रचून तपास पथकाने तिघांना जेरबंद केले.





